महाराष्ट्र

जवळच्या नातेवाईक महिलेवर बलात्कार

माजरी येथील नात्याला तडा देणारी घटना

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-

वासनेची भावना एवढी वाढली आहे की, खऱ्या नात्यालाही विसरून आपल्याच नातेवाईकावर बलात्कार करून नाती कलंकित केली जात आहेत. अशीच एक घटना माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजरी येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये नातेसंबंधाला तडा गेल्याची घटना समोर आली आहे. येथे एका नातेवाईकाने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

नात्याला तडा गेल्याची घटना माजरी येथे उघडकीस आली आहे.  येथे पती व मेहुणी घरी नसताना तुझ्या भावाशी संबंध असल्याची खोटी बातमी पसरविण्याची धमकी देत ​​नातेवाईकाने अशा महिलेवर बलात्कार केला. ही घटना ९ जुलैची आहे.  परंतु नातेवाईकाच्या धमकावण्यामुळे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली नसून, अत्यंत निंदनीय घटना उघडकीस आल्यानंतर काल16 जुलै रोजी सदर महिलेने आरोपीविरुद्ध माजरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार  आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

वरोरा उपविभागीय अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस ठाण्याचे अजितसिंग देवरे, नीता परचाके अधिक तपास करत आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये