देऊळगाव राजा येथे २० फेब्रुवारी पासून श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा पारायणचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमना चे ३७५ वे वर्ष अर्थात त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे, या महापर्वकाळाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे श्रीसंत नरहरिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव २०२५ साजरा करण्यात येतो आहे.
२० फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पावेतो श्रीसंत तुकाराम महाराज अभंग गाथा पारायण संपन्न होणार आहे.
गाथा पारायण साठी २२१ भाविक बसविण्याचा मनोदय आहे. तरी देऊळगाव राजा व परिसरातील भाविकांनी गाथा पारायण मध्ये सहभागी होऊन तुकोबारायांच्या अभंग सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पारायण वेळ सकाळी सात ते साडे अकरा पावेतो राहील, प्रवचन वेळ दुपारी साडे चार ते साडे पाच राहील, तर किर्तन वेळ सायंकाळी सात ते नऊ पावतो अशी राहील, असे कळविले आहे.