आर्वी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारh

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना आर्वी नजीक नेरी पुनर्वसन येथे घडली मंगळवारी दिनांक उघडकीस आली या प्रकरणी पोलिसांनी एकुण पाच जणांना ताब्यात घेतले असून आरोपींत एका अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
आरोपींनी पिडीतेला बळजबरीने आर्वी नजीकच्या नेरी पुनर्वसन येथे नेले त्यानंतर तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले संबंधित प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलीसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गुन्ह्याची नोंद घेऊन संबंधित प्रकरणांतील पाच आरोपींना ताब्यात घेतले पुढील तपास आर्वी येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती सुचिता मंडवाले करीत आहेत संबंधित प्रकरणी पोलिसांकडून मोठी गुप्तता बाळगली जात असून वृत्त लिहिस्तोवर आरोपीची नावे कळू शकले नाही.