ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटर सायकल चोरी प्रकरण आरोपीला अटक

मुद्देमाल जप्त : भद्रावती पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेना शेतवस्ती परिसरातून काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्नेहल संतोष महाकुलकर (वय २५, रा. पानवडाळा, ता. भद्रावती) यांस मुद्देमालासह अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय अनिल टोंगे (वय ३६, रा. गौतम नगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीला गेली होती. एमएच ३४ एएल ०६८६ क्रमांकाच्या या जुन्या वापरातील दुचाकीची अंदाजित किंमत २० हजार रुपये आहे.

दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.४५ वाजताच्या दरम्यान जेना शेतवस्ती परिसरातून ही दुचाकी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अप क्रमांक १००२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी स्नेहल संतोष महाकुलकर यांस अटक करून चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये