ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे २१ जून जागतिक योग दिन मोठया उत्साहात साजरा

जागतिक योग दिनानिमित्त श्री. शेखर सरकार यांनी योगाचे महत्व / मार्गदर्शन केले

चांदा ब्लास्ट

महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे जागतिक योग दिन दिनांक २१.०६.२०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता, योगभवन ऊर्जानगर वसाहत येथे साजरा करण्यात आला.

जागतिक योग दिनानिमित्त श्री. शेखर सरकार यांनी योगाचे महत्व / मार्गदर्शन केले तसेच योग प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यानंतर मा. मुख्य अभियंता श्री. गिरीष कुमरवार यांनी जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या योग कार्यक्रमाप्रसंगी मा. मुख्य अभियंता श्री. गिरीष कुमरवार, सर्वश्री उपमुख्य अभियंता शाम राठोड, सुहास जाधव (प्रशा.), अनिल पुनसे, अधिक्षक अभियंता श्री. दिनेश चौधरी, कल्याण अधिकारी श्री. दिलीप, सहा. कल्याण अधिकारी कु. राणू कोपटे, तसेच कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी संघटना पदाधिकारी व वसाहतवासी उपस्थित होते.

सदर योग शिबिराचे सूत्रसंचालन श्री. शेखर सरकार व आभार सौ. महाजन यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये