ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वेच्या धडकेत अज्ञात इसम जखमी होऊन मृत्यु

इसमाची ओळख पटल्यास पोलीस स्टेशन वर्धा श येथे कळवावे.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दि. 21/06/2023 रोजी सकाळी 14/00 वा. च्या सुमारास पुलफैल रेल्वे गेट जवळच्या रेल्वे लाईन वर एक अज्ञात इसम वय अंदाजे 40-42 वर्ष याचा रेल्वेने धडक लागुन जखमी होवुन मरण पावला. याबाबतची रेल्वे ट्रॅकमन रवि टेकाम यांनी पो.स्टे वर्धा श येथे माहिती दिल्याने सदर ठिकाणी जावुन वरिष्ट अधिकारी, अंमलदार यानी जावुन पाहणी केली असता एक अनोळखी इसम वय अंदाजे 40-42 वर्ष वयाचा रेल्वे रुळावर मृत अवस्थेत दिसुन आला. म्हणुन घटनास्थळ पंचनामा कार्यवाही करुन सदर इसमाचे प्रेत सा.रु.वर्धा येथे पिएम करण्याकरिता शव गृह मध्ये ठेवलेले आहे. फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो, स्टे, वर्धा श योथे मर्ग क्र 50/23 कलम 174 जाफौ अन्वये नोंद आहे. तरी त्याच्या नातेवाईकाचा शोध घेण्याकरिता व सदर इसमाचे ओळख पटविण्याकरिता आपल्या वृत्त पत्रामध्ये सदर ची बातमी प्रसारीत करण्यात विनंती.

सदर अनोळखी मृतक ईसम वय अंदाजे 40-42 वर्ष वयोगटातील आहे त्याची ओळख पटवण्याकरिता सदर मृतक ची बातमी प्रसारण होण्याकरिता व सदर मर्ग चा तपास पोहवा किशोर गाडेवान, ब.नं 888 पो. स्टे, वर्धा श हे करत आहे. सदर इसमाची ओळख पटल्यास पोलीस स्टेशन वर्धा श येथे कळवावे.

मृतकचे वर्णन – एक अनोळखी इसम वय अंदाजे 40-42 वर्ष (पुरुष) उंची अंदाजे 167 से.मी. रंग सावळा डोक्यावर टक्कल असलेले अंगात पांढऱ्या रंगाचे विटेच्या आकाराचे एम्ब्राडरी केलेल्या फुलबाहयाचे शर्ट निळ्या रंगाचा फुलपँट पायात काळ्या रंगाची प्लास्टीक चप्पल उजवे हातावर मराठीत अनिल नाव गोंदलेले बांधा मध्यम अशा वर्णनाचा ईसम

संपर्क क्र. – 07152-232506

ई-मेल – PS.wardha@mahapolice.gov.in मो. नं. 9588603327.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये