ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय संविधान अमृत महोत्सवी संविधान व उद्देशीका वितरण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी भारताचे संविधानातुन सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दिली.

भारताचे संविधान अमृत मोहत्सव निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पुरस्कार प्राप्त चंद्रकांत खरात यांच्या संकल्पनेतून तालूका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष जाधव यांच्या पुढाकारातून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सहकार विद्या मंदिर देऊळगाव मही व जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा क्रमांक 3 देऊळगाव मही या शाळेला भारताचे संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण करण्यात आले.

यावेळी सरपंच उमेश शिंगणे, माजी सभापती नितीन शिंगणे, बाजार समिती संचालक शंकरदादा शिंगणे, माजी सरपंच रामा म्हस्के, उपसरपंच मो. आशिक,शेख.डॉ.जाकीर, माजी अध्यक्ष सय्यद सईद,ग्रा. प. सदस्य वसुदेव पाटील शिंगणे, सुनिल मोरे, संदीप राऊत, धर्मा खिल्लारे,अंनथा इंगळे, तंटामुक्ती उपाध्यक्ष सुरेश झिने,आरोग्य विभागाच्या मुंढे मॅडम,शाळा समिती अध्यक्ष शेख राजू, सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य सचिन खरात, रोहित प-हाड, अप्पाराव खेडेकर,गणेश चव्हाण, शिवशंकर प-हाड,नंदकिशोर पडघाण,जिल्हा परिषद उर्दूचे मुख्याध्यापक शेख अफसर, शेख.जमीर, पत्रकार राम प-हाड, प्रकाश साकला,मो. इरफान,अमोल बोबडे, शेख समीर,यांच्यासह शिक्षक – शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये