Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नांदगाव (सूर्य) बीटा मध्ये लखमापूर शाळा ठरली जनरल चॅम्पियनशिपची मानकरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नांदगाव (सूर्या) बीटाचे बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा चे आयोजन दिनांक 20.जानेवारी ते 22.जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

बीटा तील तब्बल 26 शाळेमधून *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर* या शाळेने चॅम्पियनच्या पटकावत बालक क्रीडा स्पर्धेत लखमापूर शाळेचे नाव पुन्हा एकदा जनरल चॅम्पियनशिप ने मानांकित करण्यात आले.

नांदगाव बीटाचे विस्तार अधिकारी तथा पंचायत समिती कोरपना चे गटशिक्षणाधिकारी श्री सचिन कुमार मालवी  यांच्या मार्गदर्शनात भोयेगाव वाखर्डी केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कोपरे यांच्या नेतृत्वात सदरच्या *बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा* पार पडल्या.

सदरच्या स्पर्धेमध्ये लखमापुरने मैदानी सांघिक स्पर्ध्ये मध्ये प्राथमिक मुली कबड्डी प्रथम क्रमांक माध्यमिक मुली कबड्डी प्रथम क्रमांक माध्यमिक मुली खो-खो द्वितीय क्रमांक.तथा वयक्तिक स्पर्धेत प्राथमिक मुली रिलेरेस प्रथम क्रमांक माध्यमिक मुली रिलेरेस द्वितीय क्रमांक माध्यमिक मुली 400 मीटर धावणे प्रथम क्रमांक प्रार्थमिक मुली 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक माध्यमिक मुली थाळीफेक प्रथम क्रमांक,माध्यमिक मुले थाळीफेक द्वितीय क्रमांक.माध्यमिक मुले 200 मीटर धावणे मुले द्वितीय क्रमांक.अशा भरगच्च स्वरूपात लखमापूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नांदगाव बीटातील 26 शाळेवर मात करत जनरल चॅम्पियनशिप मिळवली.

स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर जोगी तथा सर्व व्यवस्थापन समिती गावातील सरपंच श्री अरुण भाऊ जुमनके ,शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून भरभरून कौतुक करण्यात आले .आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये