ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वस्त धान्य दुकानदाराची मनमाणी, बॅटरी नाही म्हणून वाटप नाही

ग्राहकांना दिवसभर ताटकळत ठेवले, गावाकऱ्याची मागणी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड तालुक्यातील सारंगड येथील स्वस्त दुकानदाराने ग्राहकांना धान्य वाटप करण्याचे ठरविले असता गावातील स्वस्त धान्य विकत घेण्यासाठी गावातील मंडळी जमा झाली.

गोविंदापुर येथील स्वस्त दुकानदार पि एस कोवे यांनी सारंगड येथे आल्यानंतर मशीन बॅटरी चार्जिंग नाही म्हणून चार्जिंग केले. नंतर कव्हरेज नाही म्हणून थांबविले. त्यानंतर भूक लागली म्हणून गाव गोविंदपूर येथे जाऊन येतो म्हणून कोवे गोविंदपूरला गेले तर ते कायमचे परत आले नाही मात्र स्वस्त धान्य दुकानदार न आल्याने गावातील स्वस्त धान्य घेणाऱ्याची दिवस भर वाट पाहिली पण दुकानदार न आल्याने गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला याची तक्रार तहसीलदार चव्हाण यांचेकडे गावकरी करणार आहेत.

शासनाच्या स्वस्त धान्य वाटप करणारे नेहमी माल वेळोवेळी देत नसल्याचे समजते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये