ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारसह देशी विदेशी दारूचा एकुण ५ लाख २ हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

          दिनांक 30/05/2025 रोजी रात्र दरम्यान स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक हिंगणघाट डिव्हिझन मध्ये अवैध धंद्यावर कारवाई संबंधाने पेट्रोलिंग करीत असता मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली की आरोपी नामें जितेंद्र उर्फ जितू ठाकूर रणजीत सिंग वय 31 वर्ष रा. हिंद नगर रामनगर वर्धा हा त्याच्या ग्रे रंगाच्या सुझुकी कंपनीच्या अल्टो क्रमांक एम.एच 20 सी 1315 कारने मांडगाव कडुन वर्धा येथे देशी विदेशी दारूचा माल अवैधरित्या वाहतूक करीत घेऊन येत आहे. अशा माहितीवरून मौजा मांडगाव येथे नाकेबंदी दरम्यान आरोपीच्या ताब्यातून कारसह देशी,विदेशी दारूचा एकूण 5,02,550/- रुपये चा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपीस देशी-विदेशी दारूचा माल कोठून खरेदी केला याबाबत विचारले असता त्यांनी लिओ पोर्ट बारचा मालक रा. असोला सावंगी जिल्हा नागपूर यांचे नाव सांगितल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

        सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, गजानन दरणे रामकिसन इप्पर विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राऊत, राहुल अधवाल सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली*

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये