७५६ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा : जन्मोत्सव लोकोत्सव व्हावा – आमदार मनोज कायंदे
संत चोखामेळा जन्मस्थळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुना राजा येथील संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाच्या विकास कामासाठी कसल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. यावर्षी पेक्षा पुढील वर्षी भरगच्च असा तीन दिवसाचा सोहळा आपण येथे आयोजित करणार असल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले. सविस्तर वृत्त असे की. तालुक्यातील मेहुणा राजा आहे संत पिठांपैकी संत चोखा महाराज यांचे जन्मस्थळ याचा उल्लेख इतिहासकार अग्रक्रमाने करतात. आपल्या मतदारसंघांमध्ये प्रसिद्ध अशा संत चोखा महाराज यांचा जन्मस्थळ असल्याने या गावाला एक अनन्य साधारण महत्व आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी या जन्मस्थळी प्रथमतः जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. तेव्हापासून आलेल्या प्रत्येक नेत्याने त्या ठिकाणी येऊन जन्मस्थळ विकासासाठी भरगच्च निधी देऊ असे आश्वासन देऊन गेले मात्र प्रत्यक्षात कृती पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही.
परंतु आता तसे होणार नाही. ब वर्गाचा तीर्थक्षेत्र दर्जा मिळालेल्या या जन्मस्थळाला विकसनशील चालना कशी मिळेल. आणि त्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. असे उद्गार(आश्वासन) यावेळी मनोज कायंदे यांनी काढले. संत चोखामेळा यांचा 756 वा जन्मोत्सव निमित्त मेहुणा राजा येथे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या महापूजेच्या वेळी प्रारंभी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी बि डी खरात. गट विकास अधिकारी मुकेश माहूर, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, केंद्रप्रमुख बबनराव कुमठे, मेहुना राजा प्रथम नागरिक मंदा बोंद्रे यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी तसेच गावकरी उपस्थित होते.
महापूजेने जन्मोत्सवास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14 जानेवारी रोजी सकाळी महापूजेने जन्मोत्सवास प्रारंभ झाला. यावेळेस जन्मस्थळ ठिकाणी सकाळी साडेसात वाजता जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, आणि अन्य प्रशासकीय अधिकारी त्यांच्या सहकाऱ्यांनी महापूजा केली. त्यानंतर संत चोखामेळा जन्मस्थळ या ठिकाणी आरती करण्यात आली. त्यानंतर गावातून पालखी मिरवणूक करण्यात आली.
यावेळी आमदार मनोज कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, कमलेश खिल्लारे, सरपंच मंदा बोंद्रे, उपसरपंच साहेबराव काकडे, यांच्यासह गावकरी आणि पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. पालखी मिरवणूक नंतर जन्मस्थळी झाली सभा. पालखी मिरवणुकीनंतर जन्मस्थळी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोज कायंदे, ते होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार तोताराम कायंदे, माझी जि प अध्यक्ष गंगाधर जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, आधी नगराध्यक्ष शिंदखेडा राजा देविदास ठाकरे, भगवान मुंडे, प्राध्यापक दिलीप सानप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश डोईफोडे,कमलेश खिल्लारे, प्रवीण गीते, प्रकाश गीते, बाबुराव नागरे, गजानन काकड, राजेंद्र डोईफोडे, निशिकांत भावसार, संजय तिडके, धर्मराज हनुमंते, सरपंच मंदाताई बोंद्रे, उपसरपंच साहेबराव काकडे, ग्रामसेवक मदन वायाळ,तलाठी नागरे यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.