Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वसंतराव नाईक परसबाग,नागपूर येथे महिला भेट व चर्चासत्र संपन्न.l

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नागपूर शहरातील श्रावण सखी महिला टिमच्या काही निवडक क्रियाशिल महिलांचा नलिनी पवार यांच्या नेतृत्वात (पुढाकाराने) नागपूर शहरातील मनिष नगर स्थित श्रीपतभाऊ राठोड आणि परिवाराने थेट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर दैनंदिन आहारात आरोग्यासाठी उपयोगी पडणारा भाजीपाला,फळझाडे (वेलवर्गीय,कंदवर्गीय,फळवर्गीय इ.) सोबतच विविध प्रकारची फुलझाडे त्याचप्रमाणे मुबलक प्राणवायू करिता मोठया प्रमाणात तुळस सोबत गवती चहा व औषधी वनस्पतीचीही नियोजनपूर्वक लागवड केली आहे. यापूर्वी अनेक मान्यवर,शास्त्रज्ञ, कार्यकर्ते भेट दिले असून अनेक प्रकारच्या समाजोपयोगी कार्यशाळाही येथे पार पडल्या आहेत.

काल पार पडलेल्या कार्यक्रमात सौ.नलिनीताई पवार यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातील विविध विभागात कार्यरत श्रावण सखी टिमच्या क्रियाशिल गोरमाटी (बंजारा)महिलांचा प्रामुख्याने समावेश होता.परसबाग पाहणी,चर्चा आणि कु. दिपाली राठोड व कु. अंजली राठोड यांचे परसबाग असावी दारीचे सादरीकरण झाले.

याप्रसंगी जयश्रीताई श्रीपत राठोड यांचे परसबागेचा जोगवा (मराठी) व खास गोरमाटी भाषेतील स्वरचित समस्या व कला, संस्कृती गीत गायन करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध साहित्यीक भरकाडीकार डॉ. गणेश चव्हाण पत्नी पूनम चव्हाण व नागपूरच्या विविध विभागातील राजश्री राठोड, अर्चना राठोड, नलिनी नाईक, बबीता राठोड, ज्योती पवार, अनुराधा राठोड आणि दर्शना राठोड यांचाही सहभाग होता. शेवटी श्रीपतभाऊ राठोड यांच्या हिंदी, मराठी कविता व आयुर्वेदिक तुळशी काढयाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये