Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी वाचन संस्कृती जोपासावी – प्रा. विजय आकनुरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सामाजिक व शैक्षणिक प्रगती साधायची असेल तर विविध विचारवंताची पुस्तके वाचावी आणि विविध ग्रंथाचा अभ्यास करावा आणि वर्तमान पत्रे जरूर वाचावी वाचन कौशल्य आत्मसात करून वाचन संस्कृती जोपासावी असे आवाहन महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य तथा रासेयोचे माजी जिल्हा समवयस्क प्रा विजय आकनुरवार यांनी केले ते वाचन संकल्प महाराष्ट्रचा उपक्रमा अंतर्गत शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथे आयोजित केलेल्या वाचन संस्कृती या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  संजय कुमार सिंग होते तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विध्यापिठ व्यवस्थापण समितीचे सदस्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ संजय गोरे,डॉ हेमचंद्र दूधगवडी,डॉ सुनिल बिडवाईक ,डॉ शरद बेलोरकर, डॉ राजेश गायधनी, डॉ माया मसराम, ग्रंथपाल मंगेश करंबे,डॉ सत्यन्द्र सिह ,प्रा दानवे,प्रा वरकड आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉ संजय सिग यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले व वाचन करण्याची प्रतिज्ञा दिली तर डॉ संजय गोरे यांनी वाचन केल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांनगीन विकास होतो असे ते म्हणाले.

या प्रसंगी प्रास्तविक भाषण ग्रंथपाल प्रा मंगेश करंबे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. शरद बेलोरकर यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ सुनील बिडवाईक यांनी केले यावेळी महाविद्यालयिन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये