Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव मही येथे  जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव मही येथे छत्रपती शिवरायांच्या धोरणारवर चालणारे ।। राजा शिवछत्रपती विचारमंच।। च्या वतीने मागील 9 वर्षा पासून जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.त्याच परंपरेत सातत्य ठेवत यावर्षी सुद्धा राजा शिवछत्रपती विचारमंच च्या वतीने जिजाऊ भक्तांसाठी अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवण्यात आला.

   यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  राजा शिवछत्रपती विचारमंचा चे सर्व विश्वस्थ यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

   कार्यक्रमामध्ये जातीय सलोखा जपण्यासाठी हम सब एक हे म्हणत स्वराज्य हे अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी घडवलं हे विचार डोक्यात घेऊन सर्व जाती धर्माच्या युवकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला

यावेळी सि. राजा येथे जिजाऊ दर्शना साठी चिखली, बुलढाणा, नांदुरा, खामगाव,शेगाव, जळगाव जामोद, अकोला सहित एम.पी मधून ही जिजाऊ भक्त येत असतात देऊळगाव मही हे गाव महामार्गावर असल्याने मोठ्या संख्येने जिजाऊ भक्त याच मार्गाने जातात.

सकाळी हॉटेल्स बंद असल्याने सि. राजा येथे जाणाऱ्या जिजाऊ भक्तांची मोठ्या प्रमनात दैइन होते म्हणून देऊळगाव मही येथे सामाजिक उपक्रमात अग्रस्थानी असलेले,एक समतावादी वैचारिक अधिष्ठाण असलेले  “राजा शिवछत्रपती विचारमंच” यांच्या वतीने जिजाऊ भक्तांसाठी पोहे, व चहा वाटपाचा कर्यक्रम ठेवण्यात आला होता.

या अल्पोपहाराचा मोठ्या संख्येने जिजाऊ भक्तांनी आस्वाद घेतला.याप्रसंगी सभापती समाधान शिंगणे, मन्नान पठाण दिनेश खेत्रे, रघु वायाळ सह गावकरी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी राम शिंगणे,आदील पठाण, रंगा शिंगणे,गजानन शिंगणे, बळीराम शिंगणे, संजय आंधळे,दीपक शिंगणे,सचिन शिंगणे,रवी मुळे,किशोर शिंगणे,सचिन नागरे,समाधान पवार,रघु शिंगणे,मंगेश भूतेकर, अतुल शिंगणे,यांच्या सह समस्थ राजा शिवछत्रपती विचारमंच च्या सर्व विश्वस्थ मंडळींनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये