ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुक्यातील शाळांमध्ये सि. सि. टी. व्ही. कॅमेरे न लावलेल्या सर्व शाळांची मान्यता रद्द करा : भाजयुमोची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   नुकत्याच झालेल्या बदलापुर येथील घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये सि.सि.टी.व्ही. कॅमेरे लावण्याचे निर्देश दिले. मात्र भद्रावती तालुक्यातील अनेक शाळांमध्ये सि.सि.टी.व्ही.कॅमेरे लावले नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे शासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे भाजयुमोचे जिल्हा सचिव रुपेश मांढरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. ज्या शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावली नाही अशा शाळांच्या मान्यता रद्द करण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

       ग्रामीण भागातील कित्येक शाळांमध्ये सि.सि.टी.व्ही. कॅमेरे लवण्याबाबतची जागरुकता केली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. प्रत्येक शाळांमध्ये सिसिटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक असतांना देखील ग्रामीण भागातील शाळांमध्ये सि.सि.टी.व्ही.कॅमेरे लावण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे नुकतीच कोरपना येथील एका इंग्रजी शाळेत लैंगीक अत्याचाराची घटना समोर आल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली असुन पुन्हा शाळांमध्ये सिसिटीव्ही कॅमेऱ्याचेचा मुद्दा उपस्थित होत आहे.सदरील मुद्द्यावर जातीने लक्ष घालुन प्रत्येक शाळेत सिसिटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात यावे.ज्या शाळांनी सिसिटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत अशा शाळांवर कठोर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी.अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देताना अर्जुन लांजेकार हे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये