Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर व्याहाड खुर्दच्या शिक्षिका निलंबित

विद्यार्थ्यांना बेदम मारहाण प्रकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विषय शिक्षिका म्हणून कार्यरत उज्वला पाटील या शिक्षिकेने सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ माजून सावली पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला. शिक्षण विभागाच्या चौकशीत सत्य आढळल्याने शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.

     सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद विद्यार्थी शिक्षण घेत असून 28 सप्टेंबर रोजी शिक्षिका उज्वला पाटील हिने सातव्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना वर्गात बोलावून पाण्यात द्रव्य मिसळविल्याचा संशय घेत 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यात धनश्री हरिदास दहेलकर, लावण्या कुमदेव चुधरी हे जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचारासाठी दाखल केले होते.

गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने सावली पोलिसांनी प्रकरण हाताळून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून ज़िल्हा परिषदकडे अहवाल सादर केला. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी निलंबनाचे आदेश दिले असून राजुरा पंचायत समितीला पाठविण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये