Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चकपिरंजी येथील दारूबंदीसाठी ग्रामवासीयांचा पुढाकार

ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 चकपिरंजी कार्यालय येथे ग्रामसभा ठेवण्यात आलेली होती. त्या ग्रामसभेमध्ये गावा मध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूचे धंदे चालू आहे. या दारूमुळे गावातील अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत, अनेक नागरिकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले आहेत. दारूमुळे गावामध्ये भांडण तंटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. येणाऱ्या पिढीचे आयुष्य हे धोक्याचे ठरत आहे. या अवैद्य दारूमुळे गावातील नागरिकांना, महिलांना व शाळेकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

तरी आपणास चकपिरंजी ग्राम वासियांकडून नम्र विनंती आहे की आमच्या निवेदनाचा स्वीकार करून गावाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊन सहकार्य करावे अशी चर्चा ग्रामसभेमध्ये करण्यात आली. सोबतच या ग्रामसभेमध्ये गावात अवैधरित्या चालू असलेली दारूबंदी बद्दल ग्रामसभेचे एक ठराव करण्यात आला त्यामध्ये जो गावामध्ये दारू विकणार त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही, तसेच कोणतेही शासकीय कागदपत्रे दिले जाणार नाही, दिल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशा पद्धतीचा ठराव घेण्यात आला व हा ठराव ग्रामसभेच्या सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ही ग्रामसभा अरविंदजी भैसारे उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सोबतच या ग्रामसभेला गावातील पदाधिकारी मीनाताई मिडावी सदस्य, ग्रामसेवक खोब्रागडे साहेब, पोलीस पाटील ईश्वरजी मेश्राम, रोजगार सेवक चंद्रशेखर गुरनुले, तंटामुक्त अध्यक्ष रमेशजी दासरवार,महिला संघटनेचे अध्यक्ष चैतालीताई पुनेश्वर येल्लेट्टीवर, उपाध्यक्ष अश्विनीताई गणेश भोपये, कोषाध्यक्ष वैशालीताई सुरेंद्र चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरुडवार, लक्ष्मणजी मंडरे, विनोदजी मडावी तसेच गावातील ग्रामवासीय पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये