Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उमेदचे बेमुदत कामबंद आंदोलन

पंचायत समिती सावली येथे धरणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राज्यात उमेद अभियानात विविध पदावर काम करणारे कार्यकर्ते यांनी उमेद अभियानास कायम स्वरूपी विभाग घोषित करावे या प्रमुख मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करीत असून आज सावली पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आले.

   उमेद कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये आर्थिक, व्यवहारिक साक्षरता निर्माण करण्याचे काम केल्या जाते. गावामध्ये महिलांचे स्वयंसाहायता समूह निर्माण करून बचतीचे कामासोबत व्यवसाय,विविध योजना पोहचविण्याचे काम सुरु आहे. मात्र उमेद हा स्वतंत्र आस्थापनेचा विभाग नसल्यामुळे कार्यक्रमाचा उद्देश सफल झाल्यानंतर काम बंद करून महिलांना कामावरून काढल्या जाण्याची भीती आहे.गावात समूह समन्वयक,कृषी सखी,पशु सखी व इतर पदावर काम करणाऱ्या राज्यातील कार्यकर्त्यांनी 3 ऑक्टोबर पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

आज पंचायत सावली समोर आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष जयश्री चकबंडलवार,तालुका सचिव नीता मडावी,संगीता बोरकुटे, माधुरी कांबळे, मीनाक्षी बोधलकर, तालुका समन्वयक विवेक नागरे सहभागी होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये