Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोशल मीडिया वर निषेध काय करता हिम्मत असेल तर त्याला ठेचा – भूषण फुसे

आरोपीला सहकार्य करणाऱ्यालाही अटक झाली पाहिजे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपनात जनआक्रोश मोर्चात संतप्त लोकांची मागणी

कोरपना शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरण

कोरपनात अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन शाळेतच अत्याचार केल्याची घटना दि. १ सप्टेंबर ला उघडकीस आली. विद्यार्थिनी कोरपनातील इमिनन्स इंटरनॅशनल स्कुल येथे शिक्षण घेत होती. शाळेचे शिक्षक अमोल लोडे याने गुंगीचे औषध देत तिच्यावर शाळेतच अत्याचार केला होता. त्याविरोधात आज ३ सप्टेंबर रोजी कोरपनात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच आंदोलकांनी कोरपनातील मुख्य चौकात ठिय्या दिला. जनआक्रोश मोर्च्यात हजारो महिला, पुरुष, शाळकरी विद्यार्थी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशी द्या, आरोपीला सहकार्य करणाऱ्यालाही अटक झाली पाहिजे, शाळेची नोंदणी रद्द करत असेल प्रकार होत असलेल्या शाळेवर कायमस्वरूपी टाळेबंदी केली पाहिजे अशीही मागणी संतप्त नागरिकांनी केली.

सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरले. महिला खासदार असूनसुद्धा महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर खासदार प्रतिभा धानोरकर मूग गिळून असेल तर आपण बलात्काऱ्यांना निवडून दिले आहे का असा खोचक प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस पार्टीचे मोठ्या पासून लहान नेतेही मूग गिळून असून फक्त सोशल मीडियावर लोकांच्या डोळ्यात धूळ झोकण्याकरिता सोशल मीडियावर निषेध चे मॅसेज टाकून मोकळे होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आरोपीला सहकार्य करणाऱ्यालाही अटक केली पाहिजे, नागरिकांनी आता येणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांना डालवून नव्या दमखमाच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या समाजसेवकांना संधी दिली पाहिजे असेही फुसे म्हणाले.

संतप्त नागरिक शाळा प्रशासन यांच्याविरुद्ध आंदोलक घोषणा देत होते. आंदोलनात शहरातील महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग दिसून आला. विविध संदेश आणि इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये