देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ चा अभिनव उपक्रम
अध्यक्ष गजानन तिडके यांनी काढून दिला सर्व पत्रकारांचा अपघात विमा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ देऊळगांव राजा च्या वतीने पत्रकार दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, तालुका पत्रकार संघ चे अध्यक्ष गजानन तिडके यांनी स्व खर्चाने सर्व पत्रकारांचा 10 लाखाचा अपघात विमा काढून दिला.
याप्रसंगी शासकिय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघ चे अध्यक्ष गजानन तिडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोस्ट ऑफीस चे अधिकारी वैभव शेजुळकर, प्रसिद्ध गायिका कू .प्रीत पाटील होत्या. सर्वप्रथम मराठी पत्र सृष्टीचे जनक आचार्य बालकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून सर्व पत्रकारांनी अभिवादन केले, सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच वैभव शेजुळकर व कू.प्रीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.वैभव शेजूळकर यांनी पोस्ट ऑफीस मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध अपघात विमा योजना तसेच विमा योजना ची सविस्तर माहिती दिली.
प्रीत पाटील यांनी सुमधुर आवाजात मराठी गाणे सादर करून मंत्रमुग्ध केले, कार्यक्रमाला पत्रकार संघ चे सचिव सूरज गुप्ता, उपाध्यक्ष मंगेश तिडके, कोषाध्यक्ष प्रा अशोक डोईफोडे, माजी अध्यक्ष संतोष जाधव, प्रा विनायक कुलकर्णी, शिवाजी वाघ,अशोक जोशी, संतोष वासुंबे, आदिल पठाण, मुबारक शहा, राजेश खांडेभराड, राजेश पंडीत, मोहंमद जमील, शेख कादिर, दत्ता हांडे, मुन्ना ठाकूर, विजय जाधव, किरण वाघ, उषा डोंगरे, परमेश्वर खांडेभराड, राहूल नायर तथा इतर पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन व आभारप्रदर्शन सुरज गुप्ता यांनी केले.