ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्वार्टरला आग लागल्याने आर्थिक नुकसान

दुडीपाका कुटुंबाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत

चांदा ब्लास्ट

रयतवारी कॉलरी येथील वेकोलि वसाहतीतील एका क्वार्टरला 16 जुन ला आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर क्वार्टलमध्ये दुडीपाका कुटुंब राहत असुन या कुटुंबीयांची भेट घेऊन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, विधी संघटनेचे अॅड. परमहंस यादव, आशा देशमुख, प्रतिक हजारे आदींची उपस्थिती होती.
वेकोलि कर्मचारी असलेल्या कैकाबाई दुडीपाका यांना रयतवारी येथील वेकोलि वसाहती मध्ये क्वार्टर मिळाले होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यु झाला. तेव्हा पासून त्यांच्या तिन मुली सदर क्वार्टरमध्ये वास्तव्यास आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. घटनेच्या दिवशी तिनही बहिनी बाहेर गेल्या होत्या. घरातुन धुर निघत असल्याचे लक्षात येताच शेजा-यांनी अग्नीशमन दलाला पाचारण केले. मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घरातील सामान जळून खाक झाले होते.
दरम्यान यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दुडीपाका परिवाराची भेट घेतली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी आग लागण्यामागचे कारण समजून घेत सदर परिवाराला आर्थिक मदत केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये