ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिक कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हयात अग्रेसर – संतोषसिंह रावत

इतर बँकांच्या तुलनेत बँकेच्या १५ तालुक्यातील शाखांद्वारे करण्यांत आले पिक कर्जवाटप

चांदा ब्लास्ट
शेतकरी बांधवांना पिक कर्जवाटप करण्यांत बॅक नेहमीच अग्रेसर राहीली आहे. जिल्हयात राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी याप्रमाणे २१ बँका व त्यांच्या शाखा असून लिड बँकेकडुन सन २०२३ – २४ चे खरीप पिक कर्जवाटपाकरीता जिल्हयातील सर्व बॅकांना १५४७०० शेतकरी बांधवांना रु. १२३५ कोटीचे खरीप पीक कर्जवाटपाचे लक्षांक दिलेले आहे. त्यापैकी चंद्रपूर जिमस बँकेला ८८१०० सभासदांना रु. ७०८ लक्षांक देण्यांत आले असून कोटीचे लक्षांक दि. ०१/०४/२०२३ ते दि. २०/०६/२०२३ पर्यंत बँकेने ३९२ संलग्न संस्थापैकी ३८९ संस्थांच्या ६५५४० सभासदांना रु. ५९३ कोटीचे पिक कर्जवाटप केले असून आतापावेतो लक्षांकाच्या 83.71% कर्जवाटप करून इतर बँकांच्या तुलनेत चंद्रपूर जिमस बॅक आघाडीवर आहे. अशी माहीती बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी दिली. तसेच मागील वर्षी सुध्दा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७१६६९ सभासदांना रु. ५७६ कोटीचे कर्जवाटप करून लक्षांकाच्या 100% कर्जवाटप केले करण्यांत आले होते असेही त्यांनी सांगीतले.
पावसाळा व शेतीचा हंगाम सुरू होत असून शेतकरी बांधवांना बी बियाणे, खते जमीनीची मशागत इ. कामाकरीता पैशाची आवश्यकता असून , शेतकरी बांधवांनी कर्जाचा भरणा करून त्वरीत नविन पिक कर्जाची उचल करावी असे आवाहन केले.
बँकेत अपुरा कर्मचारी वर्ग असून सुध्दा शेतकरी बांधवांप्रती सामाजिक दायित्व व बांधीलकी जोपासत इतर बँकांच्या तुलनेत बँकेच्या १५ तालुक्यातील शाखांद्वारे पिक कर्जवाटप करण्यांत आले असून बँकेचा कर्मचारी वर्ग व संचालक मंडळाचे सहकार्याने यावर्षी सुध्दा दिलेल्या लक्षांकपेक्षा जास्त पिक कर्जवाटप करून शेतकरी बांधवांना मदत करण्याचा बॅकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे पिक कर्ज वाटपात शेतकरी बांधवांना अडचणी आल्यास संपर्क साधावा असे बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये