Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

प्रज्ञा विकास वाचनालय द्वारा ग्रंथ प्रदर्शिनी संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        स्थानिक पंचशील मंडळ व्दारा संचालित प्रज्ञा विकास वाचनालय मिलिंद नगरच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे ग्रंथ प्रदर्शनी पार पडली.

   या प्रदर्शनीचे उद्घाटन लोकसेवा मंडळाचे सहसचिव अमित गुंडावार यांचे अध्यक्षतेखाली प्राचार्य सचिन सरपटवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लांजेवार सर, प्रा.स्वाती गुंडावार हे प्रामुख्याने उपस्थित होते.ग्रंथ प्रदर्शनीत महाविद्यालय मधील इयत्ता ११ व १२ वी तील ८१ विद्यार्थांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुनेश्वर गौरकार, संचालन राजेंद्र पाटील तर आभार प्रदर्शन अशोक जवादे यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता मंडळाचे पदाधिकारी नामदेव रामटेके, राजहंस मेश्राम, आशिष दुपारे वाचनालयाचे लिपिक चिंचोलकर,चंद्रकांत कवाडे यांचे सहकार्य लागले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये