नवरात्रि उत्साहात (वर्ष १)संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हिंगणघाट येथे [११/१०/२०२६-१९/१०/२०२६] रोजी सार्वजनिक हनुमान मंदिर स्थळ स्वं.मीनाताई.बा.ठाकरे बाल उद्यान मारोती वार्ड नं.२ हिंगणघाट द्वारा मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सव आयोजित करण्यात आले. या ९ दिवसाच्या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवर अतिथी यांनी नऊ दिवस सातत्याने उपस्थिती दर्शविली प्रत्येक स्पर्धेत आनंदात सहभागी झाले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रथम दिवशी आदिशक्ती प्रतिमा स्यापन व आरती करून करण्यात आली.
त्यानंतर तीन दिवस छोट्या मुलांचे मनोरंजक खेळस्पर्धा तसेच चित्रकलास्पर्धा, वेशभूषा, नृत्य स्पर्धा, घेण्यात आली.
रास रसिका गरबा गृप यांनी गरबा नृत्य सादर केले.
सरते शेवटी विजेते व सहभागी मुला/ मुली यांना परितोषीक देऊन सत्कार करण्यात आले. तसेचे या कायक्रमाला अतिथी म्हणून लाभलेले मान्यवर प्रा. देशमुख मॅडम, सौ.राजुरकर मॅडम , सौ.कुंभारे मॅडम व परिक्षक म्हणून लाभलेले श्री.किशोर भांदककर सर, सौ.प्रियंका घवड मॅडम, सौ. ज्योती पराते मॅडम तसेच नगरसेवक मा. अतुलभाऊ नंदागवळी यांना श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमात पुरुषवर्ग यांनी सुद्धा गीत गायनाचा आनंद घेतला. विशेषतः साऊंड सिस्टीम व संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी ही श्री.राहुलभाऊ नव्हाते यांनी घेतली व मदतीसाठी हातभार लावला.
या कार्यक्रमासाठी सौ. मोना चौधरी , सौ.स्वाती कावळे, सौ.भावना कुपले, सौ.प्रीती दरणे, सौ.अंजली कावळे, सौ.मंगला बुरघाटे, सौ. मनिषा येनोरकर, सौ. आदिती कोमुजवार, सौ. किरण बल्लेवार, सौ. हेमलता वांढरे, सौ. सोनाली नव्हाते. सौ. अंजुषा चिटटवार, सौ. मंजुषा चिटटवार. यांच्या परिश्रमाचे साफल्य सफल होऊन रासससिका गरबा ग्रुप तर्फे नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



