ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस मुख्यालय वर्धा येथे ‘पोलिस स्मृति दिन’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, वर्धा येथे पोलीस स्मृति दिन आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ब्रिगेडियर श्री. प्रशांत कुमार सि.ए. डि कॅम्प पुलगाव हे उपस्थित होते.

कार्यालयीन कार्यक्रमानुसार, सकाळी ८.३० वा. बँड पथकाद्वारे धून वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्मृति दिवसाची पार्श्वभूमी व त्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. यानंतर सन २०२५ मध्ये देशभरात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या विविध राज्यातील पोलिस अधिकारी व अंमलदार असे एकूण १५४ पोलीस अधिकारी व जवानांना मानवंदना देण्यात आली. तसेच कर्तव्य बजावताना प्राण अर्पण केलेल्या शहीद पोलीस अधिकारी व जवानांच्या नावांचे वाचन करण्यात आले.

मुख्य अतिथी ब्रिगेडियर श्री. प्रशांत कुमार आणि पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते स्मारक स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात आली. याशिवाय मानवंदना, शस्त्र सलामी, तीन राऊंड फायरची कारवाई, दहा सेकंदांचे मौन आणि बिगुल वादन करून हुतात्म्यांना अंतिम सलामी देण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान गडचिरोली येथे कार्यरत असतांना शहीद झालेले पोलिस अंमलदार दिलीप इवनाथे व वर्धा जिल्ह्यातील पोलिस अंमलदार गौरव खरवडे यांच्या परिवारातील श्रीमती अनिता दिलीप इवनाथे (पत्नी) आणि श्रीमती नंदाबाई नथूजी खरवडे (आई) यांचा मा. पोलीस महासंचालक कार्यालयातून प्राप्त प्रमाणपत्र, शाल आणि रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, जिल्ह्यातील विविध उपविभागांचे व शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी होमगार्ड व राज्य राखीव पोलिस दलातील पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये