गडचांदुरात पंडित काळे यांच्या वाढदिवसानिमित्त औद्योगिक क्षेत्रातील सुपरवायझर्सचा सन्मान.
औद्योगिक विकासातील खऱ्या शिलेदारांचा गौरव ; मान्यवरांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
औद्योगिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि आपल्या कार्यातून उद्योगांच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या सुपरवायझर्सचा सन्मान सोहळा गडचांदूर येथे उत्साहात पार पडला. स्थानिक उद्योजक व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव पंडित काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाचा खर्च अनावश्यक बाबींवर न करता, औद्योगिक क्षेत्रात अविरत परिश्रम घेणाऱ्या सुपरवायझर्सचा सत्कार करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. गडचांदूर येथील ज्येष्ठ नागरिक भवनात आयोजित या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी स्मिता विरूटकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. मयुरी मालेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून पंडित काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आपले मनोगत व्यक्त केले.
औद्योगिक क्षेत्रातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुपरवायझर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधण्यासोबतच उत्पादन प्रक्रिया, कामाची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन यांसारख्या जबाबदाऱ्या ते समर्थपणे पार पाडतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
या सत्कार सोहळ्यात अतुल मत्ते, मनोज थेरे, गौतम झाडे, स्वप्नील जीवतोडे, सचिन तिवारी, विनोद पटले, नितीन सोनटक्के, नंदू वडस्कर, कुणाल देवगडे, योगेश क्षीरसागर, अमित झाडे, ज्ञानेश्वर बोबडे, विजय क्षीरसागर, श्रीनु दसापुरे, महादेव वाटेकर, विनय वासेकर, कुंदन पुणेकर, अमोल लांडे, रब्बे अलाम, सचिन गिरडकर, देवेंद्र पारखी, हेमंत बाविस्कर, आकाश टिपले, निर्हाल खेडेकर आणि ऋषी चौथाले या सुपरवायझर्सचा गौरव करण्यात आला. तसेच आदिव स्नेहल विकास डोके या मुलाचाही गिनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदी बाबत विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य बी. एन. मोहितकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूरचे नगराध्यक्ष निलेश ताजने, सभापती रामसेवक मोरे, नगरसेवक महेश आवारी, विठ्ठल थिपे, पवन राजुरकर, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, उद्योजक तथा नागपूर विभाग सचिव पंडित काळे, आशिष देरकर, नरेंद्र देशकर, अविनाश दोरखंडे, श्रीरंग ढोबळे, मनोज तेलीवार, रवी बुटले आदींची उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शेंडे यांनी केले, तर संघमित्रा ताकसांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वाढदिवसाच्या निमित्ताने औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला. सुपरवायझर्सच्या कार्याचा सन्मान केल्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



