ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर पंचायत कोरपना सफाई कामगाराचा प्रश्न ऐरणीवर

भविष्य निर्वाह निरीक्षकाकडून दखल दोषीवर कारवाई होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

      चंद्रपूर जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन गैरव्यवहार व भविष्य निर्वाह निधी घोटाळ्यात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कोरपना नगर पंचायत येथे सहाय्यक आयुक्त अमलबजावणी अधिकारी कार्यालयाचे निरीक्षक तृप्ती दोहे कोरपणा नगरपंचायत सफाई कामगारांच्या तक्रारी संबंधात चौकशी करिता कोरपना नगरपंचायत येथे भेट देऊन कामगारांच्या पीएफ घोटाळा संबंधात व भविष्य निर्वाह निधीच्या पीएफ रक्कम अकाउंटखात्यात नियमितपणे जमा करण्यात आलेले नाही 2018 19 पासून घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता सांडपाणी व मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम सफाई कामगार करत असताना गेल्या अनेक वर्षापासून भूषण इटनकर व रक्षक सिक्युरिटी या कंत्रटदार एजन्सीने कामगारांचे आर्थिक नुकसान व अनियमित्ता नियमबाह्य पि एफ रकमेचा अपहार व वापर केल्याचे प्रथम दर्शनी चौकशीमध्ये उघड झाले आहे कंत्रटदार भूषण इटनकर यांनी भ्रमणध्वनीवर 15 लाख रुपये पीएफ भरल्याचे सांगितले.

परंतु आमच्या कार्यालयात चालन व अधिकृत कागदपत्र भविष्य निर्वाह निधी कायद्यानुसार सादर केलेले नाही याबाबत मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सुद्धा कत्रंटदारांनी बिल सादर केली आहे परंतु भविष्य निर्वाह निधी भरल्याबाबत कोणतीही कागदपत्र सादर न केल्यामुळे गेल्या तीन-चार महिन्याचे कामगारांचे पगार थांबवण्यात आले आहे अशी माहिती मुख्याधिकारी राम रावते यांनी दिली उपरोक्त कंत्राटदाराचे करारनामा अभिलेख वेतन नोंद रजिस्टर पीएफ चालन यु ए एन खाते विषयक संपूर्ण कागदपत्र पडताळणी व तपासणीसाठी मागविण्यात यावे याबाबत कंत्रदारांना सूचना करण्यात आले मात्रदोन्ही कंत्राटदार चौकशीच्या वेळी उपस्थित झालेले नाही याबाबत निरीक्षकांनी गंभीर दखल घेत दोघांनाही याबाबतचे पत्र आमच्या कार्यालयाकडून देण्यात येईल व गंभीर स्वरूपाचा गैरव्यवहार असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल नगरपंचायतीने देखील कत्रंटदारांस योग्य निर्देश देऊन कागदपत्र प्राप्त करून सादर करावे याबाबत आरोग्य निरीक्षक शंकर तांड्रायांना पीएफ भरल्याबद्दल खात्री न करता बिले का सादर करण्यात आली याबाबत देखील मुख्याधिकारी यांनी संपूर्ण माहिती प्राप्त करून सादर करण्याचे निर्देश दिले यावेळी या ठिकाणी कामगारांचे झालेले शोषण चार महिन्यापासून पगार एजन्सीकडून का देण्यात आला नाही कामगारांच्या पगारातील तफावती या संपूर्ण बाबी गंभीर असल्याने व शासनाच्या धोरणानुसार पीएफ रक्कम ही दरवेळेस पगार कालावधीतच जमा करणे बंधनकारक असताना कंत्राटदाराकडून झालेली अनिनियमित्तता व गेल्या सात आठ वर्षापासून पीएफ रक्कम भरण्यास व कामगारांना याबाबतची जाणीव देण्यास झालेले दुर्लक्ष यामुळे गंभीर कारवाईचे संकेत देत याबाबत एजन्सी ना जाब विचारल्या जाईल व योग्य ती कायदेशीर कारवाई केल्या जाईल असे संकेत सहाय्यक आयुक्त अमलबजावणी अधिकारी यांच्या कार्यालयातील निरीक्षक यांनी आज नगरपंचायतीमध्ये कामगार समक्ष दिले असल्याने सदर प्रकरण तातडीने निकालने काढण्यासाठी आवश्यक ती कागदपत्र कार्यालयाला पुरवण्याचे निर्देश देऊन कामगारांना योग्य तो न्याय दिल्या जाईल असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली मुख्याधिकारी राम रावतेआरोग्य निरीक्षक शंकर पांढरा कामगार आनंदराव आपटे सुधाकर आत्राम बंडू लसनते पांडुरंग मेश्राम बादल भगत यांचे सह इतर कामगार उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये