ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कंत्राटदाराच्या चुकीमुळे करंजी_जोगापूर तहानलेला

नियोजनाच्या अभावामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई ; तिसऱ्यांदा उपोषणाची गरज आहे का? ; संतप्त गावाकऱ्यांचा प्रशासनाला सवाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच गावकऱ्यांना पाणी मिळेनासे झाले. मंत्रालयात धुळखात पडलेला वाढीव अंदाजपत्रक तब्बल दोन वर्ष पूर्ण होऊन मंजूर न झाल्याने कंत्राटदाराने जलजीवन मिशनचे काम थांबविले आहे. जोगापूर गावात पाणी मिळावे म्हणून आतापर्यंत दोनदा उपोषण झाले. आजही जोगापूर गाव तहानलेला आहे. करंजी गावातही तीच स्थिती आहे. दूबागुडा मार्गावर नवीन विहीरिचे बांधकाम करण्यात आले. मात्र या विहिरीतून एकही थेंब गावकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. पाणी असूनही गावात कृत्रिम पाणीटंचाईची स्थिती आहे. पाण्यासाठी आता तिसऱ्यांदा उपोषण करावे लागणार का ? हा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे मोठे गाव. या गावची लोकसंख्या ५००० च्या आसपास आहे. करंजी ग्रामपंचायत अंतर्गत जोगापुर गावचा समावेश आहे. जलजीवन मिशन अंतर्गत गावात वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. या योजनेतून जोगापूर येथे पाण्याची टाकीचे बांधकाम करण्यात आले तर विहिर दुबागुडा मार्गावर बांधण्यात आली. मात्र कंत्राटदाराच्या चुकीमुळे जोगापुरातील टाकी आणि दूबागुडा मार्गावरील विहीर आज शोभेची वस्तू बनली आहे. जोगापूर येथे पाणीच येत नाही, तर ट्रांसफार्मर जळाले असून चुकीची मोटार टाकल्याने दुबागुड्या रोडवरील विहिरीतून एकही थेंब अद्याप करंजी गावला मिळाला नाही.

गावचा निर्मितीपासून कायम वंचित राहिलेल्या जोगापुरात पाणी मिळावे यासाठी छत्तरसिंग डांगी यांच्या नेतृत्वात दोनदा उपोषण झाले. मात्र त्याचा काहीएक फायदा झालेला नाही. प्रशासनाने नुसती वेळ मारून नेली. यामुळे आता तिसऱ्यांदा उपोषणाची गरज आहे का ? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.

यावेळी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये करंजीचे माजी उपसरपंच सारनाथ बक्षी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते छत्तरसिंग डांगी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे, शिवसेनेच्या कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष वैभव निमगडे, दिलीप शेट्टीवार आणि सुरेश देवतळे आदींचा समावेश होता.

*हातपंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष*

जोगापूर गावात हातपंप नादुरुस्त आहेत.अनेकदा तक्रार नोंदवूनही हे दुरुस्त केल्या जात नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये