Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैध जनावर वाहतूक करणारे दोन पिकअप पकडले

दोन पिकअप मध्ये एकूण १७ जनावरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

आज दिनांक 04 /01/ 2025 रोजी पहाटेच्या दरम्यान सावली पोलीस स्टेशनं चे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन पिकअप मध्ये गोवंश जनावरे कत्तलीसाठी खेडी फाटा मार्गे चंद्रपूर-आंध्रप्रदेश जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सावली पोलिस पथक खेडी फाटा येथे नाकाबंदी करून सदर दोन पिकअप थांबवून तपासणी केली असता त्यात १७ नग गाई व बैल गोवंश जनावरे दाटीवाटीने वाहनात भरून गोवंश जनावराचे पाय बांधून कत्तली करिता वाहतूक करीत असतांना मिळून आले.

        सदर १७ नग गोवंश जनावरांना हळदा येथे फाउंडेशन दाखल करण्यात आले.

      पोलीस स्टेशन सावली येथे महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम सह कलम ५(अ),९,११ प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कारवाई ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन मुसळे,पो.ह.संजय शुक्ला पो.ह.विनोद निखाडे,पो.शी.चंद्रशेखर गम्पलवार चालक जिवतोडे,चालक अमोल जांभुळे,गुरुदास गेडाम,नेपोलियन मेश्राम,यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये