आमदार निधीतील सामाजिक सभागृहाचा ताबा ग्रामपंचायतीने घ्यावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सन 2013 मध्ये मा. जैनुद्दीन जवेरी विधान परिषदेचे आमदार असताना आमदार निधी मधून बनविण्यात आले सदरचे सामाजिक सभागृह गावातील काही नागरिकांनी स्वतः आपल्या ताब्यात घेऊन सामाजिक सभागृहाचा नियमबाह्य बेकायदा स्वहितासाठी वापर करीत होते काही वर्षापासून हे सामाजिक सभागृह बेवारस पडले होते.
सामाजिक सभागृहाचा नियमबाह्य होत असलेला वापर याबाबत आम्ही प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती
सामाजिक सभागृहाचा ताबा ग्रामपंचायतीने घेऊन सदरचे सामाजिक सभागृह नागरिकांच्या सोयी सुविधे करिता उपलब्ध करून द्यावे याकरिता आम्ही मागील 4 वर्षापासून प्रशासनासोबत सतत पाठपुरावा करीत आहे
काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत मध्ये सचिव यांना सदरच्या सामाजिक सभागृहाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीला दिला आहे म्हणून ग्रामपंचायतीने सदरचे सभागृह आपल्या ताब्यात घ्यावा अशी विनंती केली होती
तेव्हा तिथे उपस्थित नांदा ग्रामपंचायतचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले सांगत होते असा कसा ताबा घेता येईल ? जागा नांदा ग्रामपंचायतची नाही तुला खूप समजते का ? जेव्हा आम्ही सचिवांशी बोलत होतो तेव्हा विकारण आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला
सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतला ताबा दिल्यावर ग्रामपंचायतीने सरळ सरळ रीतसर ताबा घेतला नाही नांदा ग्रामपंचायतीने पत्र पाठवून पंचायत समितीला पत्र दिले सामाजिक सभागृहाचा ताबा घेण्याबाबत मार्गदर्शन करावे
गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपना यांनी नांदा ग्रामपंचायतीला आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचा ताबा घ्यावा असे मार्गदर्शन पत्र पाठविले आहे
नांदा ग्रामपंचायतचे काही पदाधिकारी खास करून उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले शांती कॉलनी येथील लोडर दवाखान्यात जवळ असलेल्या सामाजिक सभागृहाचा ताबा घेण्यास अडथळा करीत आहे
सन 2013 पासून सामाजिक सभागृह धूळ खात पडले आहे ग्रामपंचायत च्या सुज्ञ सदस्यांनी या इमारतीचा ताबा घेऊन हे सामाजिक सभागृह नागरिकांकरिता खुले करून द्यावे या सामाजिक सभागृहाचा जनकल्याणा करिता वापर झाला पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.