इंदिरा गांधी महिला महाविद्यालय येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम
चांदा ब्लास्ट
इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून काही क्षण मौन धारण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. शहनाज पठान यांनी पुष्प अर्पन करून आदरांजली वाहिली. व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध महत्वपूर्ण योगदानावर माहिती सांगुन, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा शिक्षणाच्या आधारे काय केले जाऊ शकते याविषयी विद्यार्थिनिंना मार्गदर्शन केले. प्रा. संजय बाबरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या देशाच्या विकासातील योगदान विषद करून कृतज्ञता व्यक्त केली. बी.ए व बी.कॉम च्या काही विद्यार्थिनिंनी बाबासाहेबांच्या स्त्रीयांच्या योगदानावर आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचा तसेच विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता.