डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावातच एक प्रेरणा,संघर्ष,भावना आणि तळमळ आहे – रवींद्र मुप्पावार
विश्वशांती विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावातच एक प्रेरणा आहे,संघर्षआहे,भावना आहे,तळमळ आहे,सहनशीलता आहे,अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक आहे,तडफदरपणा आहे, दुःख समजून घेणारे ममत्व आहे,त्यामुळे बाबासाहेब एक नाव नाही तर यात असंख्य लोकांच्या भावना आहेत,बाबासाहेबांनी घेतलेले शिक्षण आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष सर्वश्रुत आहे,असे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार महापरिनिर्वाण दिनी बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर जाधव हे होते तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून मंचावर,मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार, सहाय्यक शिक्षक धर्मरवी वनकर आणि शिक्षिका प्रनोती सोनुले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस,किशोर संगिडवार,श्वेता खर्चे,धर्मेंद्र दुधे,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी केले तर आभार सहायक शिक्षक महेश देहारकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले.