अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कडून आपल्या सीएसआरअंतर्गत जवळपास असलेल्या बैलमपूर व मानोली गांवातील एकूण 170 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले.
या शिबिरात रक्ताच्या विविध चाचण्या सुध्या करण्यात आल्यात त्यातहिमोग्लोबिन,सिकलसेल,शुगर ,बी पी ,एच आई व्ही , बायोचेमिस्टरी आणि सी बी सी यांचा समावेश आहे.
या शिबिराला ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथील आस्मा पठाण व वन स्टॉप सेंटर मॅनेजर विद्या धोबे आणि त्यांचे आरोग्य सहकारी उपस्थित होते.
या शिबिरादरम्यान तपासण्यात आलेल्या रक्त चाचणीत काही दोष आढळून आल्यास त्यावर योग्य तो उपचार करण्यात येईल असे प्रतिपादन गामीण रुग्णालय गडचांदूर च्या आस्मा पठाण यांनी केले.
ह्या शिबिरामुळे गांवातील नागरिका मध्ये लपून बसलेला आजार माहित होईल व त्यावर योग्य उपचार करून त्याला वाढण्यास थांबवता येईल असे गांवकऱ्यांचे मत होते तर गांवातील सरपंच,उपसरपंच,आशा वर्कर,अंगणवाडी शिक्षिका व शाळेतील शिक्षकांचा सहयोग लाभला
शिबिरादरम्यान बोलताना नागरिकांनी म्हटले कि माणिकगढ सिमेंट नेहमीच आपल्या समाजकार्यातून नवनवीन उपक्रम राबवतात त्याचा आम्हा सर्व गावकऱ्यांना चांगला फायदा होत आहेत त्याबद्दल गावकऱ्यांनी माणिकगढचे आभार सुद्धा व्यक्त केलेत