एमएसपीएम ग्रुपचे अध्यक्ष पी एस. आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘सफर’ पुस्तकाचे प्रकाशन
चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचे नाव सन्मानाने घेतले जाते. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वल करुन माँ भवानी, माँ सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली, तसेच संस्थापक पी. एस. आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ”सफर” पुस्तकाचे प्रकाशन करून परामॉण्ट कॉन्व्हेंट येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव प्रीती पांडुरंगजी आंबटकर,उपाध्यक्ष पियुष आंबटकर, डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर, प्रांजली रघाताटे, डॉ.पायल पी.आंबटकर,प्राचार्य शोभना मॅडम,प्राचार्य फैय्याज सर, प्राचार्य राजदा मॅडम, प्राचार्य अश्विनी मॅडम, प्राचार्य मस्के सर, उपप्राचार्य जमीर सर, प्राचार्य गाडगे सर, प्राचार्य मोजेस सर, प्राचार्य पिंपळकर सर, प्राचार्य राजकुमार सर, प्राचार्य जोगे सर, रजिस्ट्रार बिसन सर मंचावर उपस्थित होते.
दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीतुन या संस्थेचा जन्म झाला ,तसेच त्यांचे सुपुत्र उपाध्यक्ष पियुष आंबटकर आणि पत्नी अंकिता पियुष आंबटकर तसेच डॉ. पायल पी.आंबटकर, प्रांजली रघाताटे यांच्या सोबतीने जिद्ध आणि संस्थेविषयी असेलेली आस्था यामुळे हे शक्य झालेले आहे,या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातून विद्यार्थांना, चंद्रपूर जिल्ह्यातून दर्जेदार आणि मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या करियरसाठी नवी दारे उघडली आहेत ते नेहमी यशस्वी व्हावे अशी कामना करीत सर्व शिक्षक गण. ह्यांनी पी एस. आंबटकर यांना वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्याजर्न करणारे विध्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध-अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत,शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विध्यार्थ्यांवर सुसंस्कार,नितमूल्य,साकारत्मक जिवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे,त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहे,प्रत्येक विध्यार्थी स्वातंत्र तेज,बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो,त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकाने विधार्थांमधील सप्तगुण हेरून त्यांच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो,असे मत संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमा करीता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, सुत्रसंचालन प्रा. नौषाद सर यांनी केले.