Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रेरणादायी संघर्षाची गाथा – आ. किशोर जोरगेवार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते एक महान तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि मानवतेचे खरे सेवक होते. त्यांनी शिक्षण, समानता, आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांनी कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले. संघर्षातून समाजाला विषमतेच्या विळख्यातून मुक्त करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाला अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रेरणादायी संघर्षाची गाथा म्हणता येईल, असे विधान आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्य रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाला भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते दशरथसिंह ठाकुर, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, विमल कातकर, निलिमा वनकर, अमोल शेंडे, नकुल वासमवार, आशा देशमुख, सुमित बेले, स्वप्नील पटकोटवार, चंद्रशेखर देशमुख, हेरमन जोसेफ, डॉ. सत्यजित पोद्दार, विनोद अनंतवार, छाया चवरे, सुरेंद्र अंचल, संजय महाकालीवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “आपण आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नाही, तर एका क्रांतीचे प्रतिक आहे. त्यांच्या जिद्द आणि आत्मविश्वासाने त्यांनी स्वतःसाठी आणि समाजासाठी समानतेचा मार्ग शोधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान केवळ भारतापुरते मर्यादित नाही. ते एका वैश्विक विचारधारेचे प्रतिक आहेत. शिक्षण, समानता, आणि सामाजिक न्याय या तत्त्वांवर आधारित समाज उभारण्यासाठी त्यांनी दिलेला संदेश अमूल्य आहे.

  महापरिनिर्वाण दिन हा त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा दिवस असला तरी, त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा दिवस आहे. डॉ बाबासाहेब यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून आपण त्यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी वचनबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये