Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी कॉलेज मध्ये महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर, रजिस्टर बिसेन सर यांनी अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. पद्मनाभ गाडगे, उपप्राचार्य अनिल खुजे, प्रा. कल्याणी कडूकर प्रा. आशिष ब. देहारकर, डॉ. उज्ज्वला सावरकर, प्रा.नरेश गणवीर, प्रा. एम. टी. शेख,प्रा. जयश्री आसुटकर, प्रा. सुलभा बोबडे उपस्थित होते.

दि. ६ डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांचं समाजातील अतुलनीय योगदान स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो लोक आणि अनुयायी जमतात. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महापरिनिर्वाण दिवस आहे. ६ डिसेंबर २०२४, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६८ वी पुण्यतिथी आहे. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून गणला जातो.

या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये