ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे सेलू तील प्रज्वल भिंगारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

सेलू तालुक्यात होत आहे त्याच्या यशाची सर्वीकडे चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : दिनांक ९ जून २०२६ मंगळवार दिवशी नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये सत्र क्रमांक १२७ व्या दिक्षांत संचलन

सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यात सेलू तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक प्रज्वल भाऊराव भिंगारे हे सहभागी होते. MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या 2022 च्या परीक्षेत त्यांनी या पदाला गवसणी घातली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण हे एक वर्षाचे असून अत्यंत खडतर स्वरूपाचे असते. वर्षभराच्या प्रशिक्षणादरम्यान भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक विज्ञान, सायबर गुन्हे आणि गुन्हेशास्त्र या विषयांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शारीरिक कवायत, गोळीबार सराव आणि योग यांचाही विशेष समावेश होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मा. सदानंद दाते हे उपस्थित होते. अत्यंत खडतर स्वरूपाचे हे एक वर्षाचे प्रशिक्षण प्रज्वल भाऊराव भिंगारे यांनी यशस्विरीत्या समर्पन व जिद्दीने पूर्ण केलेले आहे. त्यांची स्टार ओपेनिंग सेरेमनी त्यांच्या पालकांद्वारे पार पाडण्यात आली.

परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती गडचिरोली परिक्षेत्रात झालेली आहे. त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक तर आई गृहिणी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिपचंद चौधरी विद्यालय, सेलू येथे तर बारावी पर्यंत चे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, वर्धा येथे झाले आहे. त्यांनी पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड येथून संपादीत केली आहे. एक निष्ठावान पोलीस अधिकारी बनून समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा त्याचा मानस आहे. ते आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, भाऊ, आजोबा सोबतच शिक्षकवृंद यांना देतात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये