ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीसांची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वर्धा जिल्ह्यात दिनांक 01/05/2026 ते 31/05/2026 दरम्यानच्या कालावधीत वॉश आऊट मोहीम, ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यासारख्या विविध मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती.

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व १९ पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस मुख्यालय व ईतर शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला. विविध मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्री, जुगार, अंमली पदार्थ (NDPS), शरीरविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईत सराईत गुन्हेगारावर पाळत ठेवुन गुन्हे दाखल करण्यात आले.

कारवाईचा संक्षिप्त तपशीलः

अवैध दारू विक्रीः अवैध दारु विक्री संबंधाने जानेवारी 2026 ते मे 2026 दरम्यान 07 वॉशआऊट मोहीम राबविण्यात आलेल्याविषेस मोहींमांसह माहे मे 2026 पावेतो संपूर्ण वर्धा जिल्ह्यात 2956 कारवायांमध्ये एकूण 19,62,99,855 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

NDPS (अमली पदार्थ): वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थाची विक्री करणा-या 74 आरोपीतांवर कारवाई करुन कारवाई दरम्यान 57,90,851/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीतांविरुद्द एन.डी.पी.एस. कायद्यान्वये 43 गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

जुगारः महाराष्ट्र जुगारबंदी कायद्याअन्वये जानेवारी 2026 ते मे 2026 पावेतो संपुर्ण वर्धा जिल्ह्यात 245 कारवायांमध्ये एकूण 45,79,393 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आर्म्स ॲक्टः जिल्ह्यात अवैध शस्त्र सोबत बाळगुन गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगारांना जानेवारी 2026 ते मे 2026 दरम्यानच्या काळात वेळोवेळी चेक केले असता आरोपीतांजवळ चाकु, तलवार, कोयता, सुरा यासारखे शस्त्र मिळुन आल्याने त्यांचेवर भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये एकुण 56 गुन्हे नोंद करण्यात आले.

भविष्यातही जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अवैध कृत्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, वर्धा. यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये