ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुर्सा येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

पहिल्या दिवशी 91 क्विंटल सोयाबीनची खरेदी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती च्या वतीने सोयाबीन खरीदिला सुरवात

           कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचा उपबाजार आवार मुर्सा येथे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ शनिवारपासून सोयाबीन खरेदीच्या शुभारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी 91 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली. आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बाजार समितीचे सभापती भास्कर लटारी ताजने उपस्थित होते. यांच्यासह बाजार समितीचे संचालक परमेश्वर ताजणे , विनोद घुगूल, शामदेव कापटे, तसेच बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह अडते बाबा चौधरी, मे. गौरीनाथ अँग्रो प्राडक्टस प्रा. लि. मुर्साचे संचालक अशोक हरियाणी, भारती हरियाणी, सागर हरियाणी, आणि कायनात हरियाणी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन पहिल्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी आलेले शेतकरी श्री. खुशाल देरकर रामपूर श्री. गौरव चौधरी गडचांदूर, शेख कलीम गडचांदूर, भिवाजी धानोरकर कोची यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम आयोजनासाठी बाजार समितीचे मापारी श्री. गणेश नागोसे,पारखी, कर्मचारी संजय शेंडे, प्रवीण राहुलगडे, विलास पालकर, मुकुंदा ठेंगणे यांनी सहकार्य केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपआपला शेतमाल मुर्सा येथील मे. गौरीनाथ अँग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि. मुर्सा येथे विक्रीस आणावा, असे संयुक्त आवाहन भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने, उपसभापती सौ.अश्लेषा भोयर (जीवतोडे)आणि सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये