Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे,उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे पर्यवेक्षक श्री शंकर तुराणकर, पर्यवेक्षिका लता घाटे एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन परसराम चौरे यांनी केले. महात्मा गांधी व अहिंसा या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आली. मिडल स्कूल विभागातून प्रथम क्रमांक दुर्गेश्वरी गहूकर, द्वितीय क्रमांक वंश मालेकर, तृतीय क्रमांक कृष्णा राऊत,हायस्कूल विभागातून प्रथम क्रमांक सोहम पांचाळ,द्वितीय क्रमांक सिद्धी खाडे, तृतीय क्रमांक वास्तव पालीवाल, प्रोत्साहन पर तनुश्री हस्ते ज्युनिअर कॉलेज विभागातून प्रथम क्रमांक पवन कन्नूरवार ,द्वितीय क्रमांक सुप्रिया बुरान,तृतीय क्रमांक ज्योती मुंडे प्रोत्साहन पर धनश्री घाटे पल्लवी वाघमारे यांना मिळाला,या स्पर्धेचे परीक्षण हायस्कूल व मिडल स्कूल विभागाचे श्री कोयचाडे सर व लोखंडे मॅडम,ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्रा माधुरी पेटकर मॅडम व मंजुषा टेकाम मॅडम यांनी केले. गांधी जयंती निमित्त समितीतील सर्व सभासद शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये