नागपूर जि.प.वरीष्ठ अधिकाऱ्यांची परसबाग भेट
अतिरिक्त मुख्यकार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे सह प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मनिष नगर नागपूर येथील प्रसिद्ध वसंतराव नाईक परसबाग पाहणी दौऱ्यासाठी नागपूर जिल्हयाचे कर्तव्यतत्पर मनमिळावू जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी मा.कमलकिशोर फुटाणे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.निलेश गुंड आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.अनिल दहीफळे सह पाहणी दौऱ्यासाठी आले.इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील उपयोगी आणि दिशादर्शी उपक्रमाची पाहणी केली. विद्यार्थी व संबंधित घटकांना सोबत घेवून पर्यावरणाच्या क्षेत्रात भरीव कार्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.भविष्यात या उपक्रमाचा समावेश जि. प. शाळांमध्ये करून शालेय परसबाग सेंद्रिय व अधिक उत्पादक करण्यासाठी आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा मनोदय दोन्ही शिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केला. नुकताच दिल्ली विधानसभेत पर्यावरण गतीविधी आणि मानव रचना इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या बाल संसदेत सहभाग घेतल्या बद्दल अंजली राठोड आणि संपूर्ण भारतातून दिल्ली विधानसभेतील बाल संसदेची आयकॉन हा बहुमान पटकावल्याबद्दल दिपाली राठोडचे भेटवस्तू आणि महत्वपूर्ण प्रेरणादायी पुस्तक संच देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
दोघींचे तोंडभरून कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.भेटी दरम्यान आरोग्यदायी कुटूंब -आरोग्यदायी राष्ट्र निर्मिती वरील दोघी बहीणीचे सादरीकरण मन लावून समजून घेतले.सर्व अधिकाऱ्यांना दिपाली व अंजली राठोड लिखीत वसंत बहार हे इंग्रजी पुस्तक भेट देण्यात आली. ज्ञानप्रकाश लोकसंस्थेचे श्रीपत राठोड आणि जयश्री राठोड द्वारा संकलित व लिखित विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि संबंधित सर्व घटकां उपयोगी ठरणाऱ्या ज्ञानप्रकाश या पुस्तकांचे मुखपृष्ठ आणि प्रकाशन पूर्वीचे ड्राफ्ट देण्यात आले. शेवटी वसंतराव नाईक परसबाग निर्मित आरोग्यदायी काढयांनी कार्यक्रमाची सांगता झाली.



