ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे पदवीधर निवडणूक संदर्भात बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक – २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षकांसोबत निवडणूकपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी शिक्षक व पदवीधर मतदारांच्या मागण्या व समस्यांबाबत शिक्षकांशी संवाद साधला.

या बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असून जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत शिक्षकांना आवाहन केले. तसेच भाजपा महायुतीचे उमेदवार श्री.सुधाकर कोहळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्व शिक्षक पदवीधर मतदारांनी पूर्ण ताकदीनिशी, एकदिलाने आणि एकजुटीने कार्य करण्याचा ठाम निर्धार या बैठकीत करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाचे कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा स्मिता चिताडे, नगरसेवक तथा नोंदणी प्रमुख सुरेश मेश्राम, सतीश बेतावार, प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम, उपमुख्याध्यापक माधुरी मस्की, अरविंद कोरे यांचेसह प्राध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये