Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवक काँग्रेस अध्यक्ष शिक्षकावर विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना: कोरपना तालुक्यातील खाजगी शाळेत कार्यरत आणि युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शिक्षक अमोल लोडे यांच्यावर विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.

तक्रारीनुसार, आरोपी शिक्षकाने उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली विद्यार्थिनीला शाळेत बोलावले आणि तिचे लैंगिक शोषण केले. आरोपीने पीडित मुलीला धमकी दिली होती की, जर तिने ही बाब कुणाला सांगितली, तर तिच्या कुटुंबाला त्रास होईल. त्यामुळे पीडितेने सुरुवातीला कुणालाही ही गोष्ट सांगितली नाही. मात्र, काही दिवसांनी पीडित मुलीने ही बाब आपल्या मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीने ही गोष्ट आपल्या आईला सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ कोरपना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे आरोपी अमोल लोडे याच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम ३७६ आणि बालकांचे लैंगिक शोषण रोखण्याच्या पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोरपना पोलीस ठाण्याचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीने यापूर्वी देखील अशा प्रकारचे अन्याय केले असल्याची शक्यता तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीला योग्य त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या आहेत आणि तिच्या वैद्यकीय तपासणीनंतर आणखी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. संबंधित घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गंभीर पावले उचलून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

पोलीस विभागाने आणखी आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये पीडित व्यक्तींनी समोर येऊन तक्रार करावी आणि आपला आवाज उठवावा, ज्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होईल

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये