Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गिरड हद्दीतील जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

आलीशान महागड्या वाहनासह एकुण 50 लाख 15 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जुगार अड्याबाबत गिरड हद्दीतील अशोक गड्डमवार हा त्याचे साथीदारसह गिरड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जुगार भरवित असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना मुखबिरकडून खात्रीशीर माहीती मिळताच दि. 23/09/24 ते 24/09/24 चे रात्र दरम्यान रात्रभर पाळत ठेवून हालचालीवर लक्ष ठेवुन वेगवेगळी पथक तयार करुन सापळा रचुन मौजा फरीदपूर येथीन शेतातील बंडयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या टिम ने जुगार अड्ड्यावर चारही बाजुने घेराव करुन छापा घातला असता जुगार अड्ड्यावर जुगार खेळतांना आरोपी क्र. 1) सलिम शेख गफ्फार शेख वय 29 वर्षे रा पुलफैल वर्धा 2) राजु नथ्थुजी नौकरकर वय 52 वर्ष रा. गिरड 3) पांडुरंग रामाजी फलके वय 42 वर्ष रा. धगडबन 4) रामलाल भगवानजी गंडे वय 40 वर्ष रा. गिरड 5) आतिश विकम रामटेके वय 38 वर्ष रा. नंदोरी 6) विशाल अशोक रोहणकर वय 27 वर्ष रा. वार्ड नं. 3 गिरड 7) सचिन आनंदराव धारणे वय 25 वर्ष रा. कोरा (8) अंकित चंद्रशेखर ढोक वय 23 वर्ष रा. कोरा 9) अरुन विठ्ठल सावरकर वय 50 वर्ष रा. नंदोरी 10) प्रकाश बापुरावजी लोहट वय 45 वर्ष रा. गिरड 11) कवडु नारायन नंन्नवरे वय 30 वर्ष रा. फरिदपुर 12) योगेश महादेव महाकाळकर वय 56 वर्ष रा. हिंगणघाट 13) रोषन राजु नारनवरे वय 20 वर्ष रा. कोरा 14) प्रेमदास लहुजी चांग वय 27 वर्ष रा. गिरड 15) राजु उर्फ राजेश हरिभाऊ तिमांडे वय 44 वर्ष रा. तरोडा 16) महेंद्र किसनजी झाडे वय 38 वर्ष रा. समुद्रपुर 17) वैभव रमेशराव मेहता वय 35 वर्ष रा. सुरगांव (रहकी) 18) जगदिश मुधुकर रोकडे वय 34 वर्ष रा. सेलु 19) रुपेश अरुण घोडे वय 32 वर्ष रा. बरबडी 20) प्रफुल देवरावजी बोरीकर वय 40 वर्ष रा. गिरड 21) जितेंद्र उर्फ जितु मधुकर झाडे वय 35 वर्ष रा. नंदोरी 22) मंगेश कुंडलिक खाटीक वय 43 वर्ष रा. गिरड 23) सचिन ब्रम्हानंद लोखंडे वय 31 वर्ष रा. कोरा असे व 24) डिस्कव्हर गाडी क. एमएच 32 यु 4001 चा चालक (पसार) हे 52 तास पत्यावर पैशे लावून हारजीतचा खेळ खेळतांना मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातुन जुगाराचे नगदी 2,16,860/-रु., 22 मोबाईल संच किंमत. 3,04,000/-रु., 6 चारचाकी वाहन व 6 दुचाकी वाहने किंमत 44,95,000/- रु. असा एकुण 50,15,860/-रु. चा मुद्येमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करुन आरोपींना सदर जुगार अड्ड्याबाबत सखोल विचारपूस केली असता सदर जुगार अड्डा हा गिरड येथे राहणारा अशोक गड्डमवार, हा त्याचे साथीदार विशाल बहादूरें रा. धोंडगाव, विलास लभाने रा. गिरड तसेच शेत मालक सुधिर धानोरे रा. फरिदपुर यांनी संगनमताने 52 तास पत्त्यावर मांग पत्याच्या जुगारावर पैश्याची बाजी लावुन स्वताचे आर्थिक फायदया करीता जुगार भरविलेला आहे. असे एकुण 28 आरोपी विरुध्द जुगार कायद्यान्वये पोलीस स्टेशन गिरड येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक श्री. उमाकांत राठोड, श्री. अमोल लगड, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, गजानन लामसे, सचिन इंगोले, भुषण निघोट, प्रमोद पिसे, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, रामकिसन ईप्पर, मनिष कांबळे, विकास मुंडे, गोपाल बावनकर, अमोल नगराळे, अभिषेक नाईक, मुकेश ढोके, दिपक साठ, अरविंद इंगोले, हर्षल सोनटक्के, मंगेश आदे, शुभम राऊत, राहुल अधवाल यांनी केली असुन तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये