Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नदी परिसर स्वच्छ करून ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ साजरा

'जागतिक नदी दिन' निमित्त पर्यावरण पूरक संदेश 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय हरित सेना व रोव्हर व रेंजर्स पथकाने यशोदा नदीच्या काठी असलेला कचरा गोळा करून योग्य विल्हेवाट लावली व शहरवासीयांना पर्यावरण पूरक परिसर ठेवा हा संदेश दिला. यात ११५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

सदर नदी परिसर स्वच्छता प्रकल्प एनसीसी अधिकारी तथा एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर संतोष तुरक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनिता सोनारे यांनी स्वच्छता अभियानाला शुभेच्छा दिल्या.

यात अंडर ऑफिसर आदर्श नाईक अंडर ऑफिसर श्रद्धा मडावी कोमल शितळे, मनोज नेहारे, अभिषेक नेहारे, सौरभ साव, सुजल पराते, साक्षी येळणे, खूशी पचारे तसेच एनसीसी छात्र सैनिक, रासेयो स्वयंसेवक व रोव्हर रेंजरनी सहभाग घेऊन नदी स्वच्छता अभियान यशस्वी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये