Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री व्यंकटेश महाविद्यालयात दीक्षारंभ समारोह उद्घाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयामध्ये स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्राम म्हणजेच दीक्षारंभ समारंभाचे उद्घाटन संत भगवान बाबा महाविद्यालय सिंदखेडराजा येथील प्राचार्य डॉ. किशोर वळसे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ग्रंथपाल डॉ. उमेश देशमुख हे उपस्थित होते. राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांची देखील या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना महाविद्यालयाविषयी अधिक माहिती व्हावी यासाठी विद्यापीठ निर्देशानुसार दिनांक 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान दीक्षारंभ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटक म्हणून उपस्थित डॉ. किशोर वळसे यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात आवाहन केले. एनपीटीएल सारखे कोर्सेस करा व स्वावलंबी व्हा अशी माहिती वळसे यांनी दिली. शिक्षण हे केवळ चार भिंतीपुरते मर्यादित न राहता ते प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण पूर्ण केले पाहिजे, ज्ञानकक्षा विकसित व्हाव्या यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, असे मत सुद्धा डॉ. वळसे यांनी व्यक्त केले.

समारोहासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित डॉ. उमेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दीक्षारंभ कार्यक्रमाची आवश्यकता व महत्त्व पटवून दिले.

दिनांक 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सोयी सुविधा, एनईपी2020 याविषयी माहिती दिली जाणार आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे महत्व, ग्रंथालयातील सुविधा, क्रीडा विषयक सुविधा याबाबत सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती पुरवली जाणार आहे.

अभ्यासेतर उपक्रमासाठी महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस मध्ये विद्यार्थी कसा घडू शकतो, विद्यापीठ परीक्षेला कसे सामोरे जावे, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व कसे करता येईल यासह विद्यार्थी तक्रार निवारण, अँटी रॅगिंग याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थी सुविधा केंद्र, शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थिनींसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती, अभ्यास दौरा अशा विविध घटकांची माहिती या दीक्षारंभ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

या दीक्षारंभ उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र गणबास यांनी केले. प्रास्ताविक प्रा. गोविंद ढगे यांनी केले तर अतिथींचा परिचय मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार डॉ. दीक्षापुत्र बिऱ्हाडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिक्षारंभ कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव व प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती प्रमुख प्रा. रामभवन सरोज व इतर सदस्य परिश्रम घेत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये