महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिना निमित्य स्वच्छता ही सेवा या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महात्मा गांधी क. महाविद्यालयाचे प्राचार्य . साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, सेवानिवृत्त उपप्राचार्य. विजय आकनुरवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रदिप परसुटकर, सुधीर थिपे, सचिन भैसारे, आशिष देरकर, नरेंद्र हेपट, चेतना कामडी, बाळू उमरे व रासेयोचे विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. नंदा भोयर व प्रा. संगीता पुरी यांनी केले. या स्पर्धेत एकूण 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला ,या स्पर्धेत प्रथम क्रमांक सुप्रिया बुऱ्हान, द्वितीय क्रमांक धनश्री घाटे, तृतीय क्रमांक प्रसराम चावरे, तसेच प्रोत्साहनपर क्रमांक शिफा बक्ष, रुबी कैथल व विकी पवार या विद्यार्थ्याने पटकाविला या स्पर्धेचे सूत्रसंचालन गौरी हनुमंते व आभार प्रदर्शन सागर डोहे या विद्यार्थ्यांनी केले.