Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

एस टी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा आगाराची MH 40 N 9460 क्रमांकाची बस सायंकाळी 7:00 वाजताच्या सुमारास गडचांदुर कडून राजुरा कडे येत असताना कापणगाव जवळील जसवंत सिंग ट्रान्सपोर्ट च्या कार्यालयाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. #Accident

प्राप्त माहितीनुसार सदर बस डाव्या बाजूनेच येत होती मात्र दुचाकीस्वार प्रकाश बोढेकर, कापणगाव हा व्यक्ती ट्रान्सपोर्ट कार्यालयाकडून अचानक महामार्गावर थेट बसच्या समोर आल्याने बस चालक अपघात टाळु शकला नाही व अपघातात प्रकाश बोढेकर ह्यांचा जागीच मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये