Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथील गणेश मंडळांना खासदार प्रतिभा धानोरकरांची भेट !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

   चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भद्रावती शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपांना दि. 13 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले व मतदार संघातील नागरिकांना सुख व समृद्धी लाभो अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली. यावेळी त्यांनी मंडळाचे अध्यक्ष तधा इतर पदाधिकाऱ्यांची संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या व प्रत्येक गणेश मंडळांना वर्गणीच्या रूपात आर्थिक मदतही केली त्याचबरोबर शहरात गणेश उत्सव साजरा करीत या उत्सवाचे सातत्य कायम राखल्याबद्दल गणेश मंडळाचे खासदार धानोरकरांनीआभार सुद्धा मानलेत यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगरसेविका प्रतिभा सोनटक्के, शितल गेडाम, कविता सुपी ,गोरू थैम, संजय गायकवाड,विजय भोयर, तनु शेख आधी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये