Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कढोली खुर्द येथे शेतकरी संघटनेच्या गडाला सुरुंग 

डॉ. विनायक डोहे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : तालुक्यातील कढोली खुर्द या शेतकरी संघटनेच्या गडाला भाजपाने सुरुंग लावला लावला आहे. शनिवारी शेतकरी संघटनेचे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राजुरा विधानसभा प्रमुख देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी सरपंच निर्मलाताई मरस्कोल्हे, माजी उपसरपंच मारोती वडस्कर, बोरी नवेगावचे विजय मडावी,रवींद्र कारेकर, आसन खुर्द येथील श्रीराम नांदेकर, संजय आस्वले यांनीही पक्ष प्रवेश केला.

मागील काही दिवसांपासून कढोली खुर्द ग्रामपंचायत चर्चेत आहे. येथे सरपंच निर्मलाताई मरस्कोले आणि सीताबाई पंधरे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने काँग्रेस समर्थित उमाजी आत्राम सरपंच झाले आहे. या घडामोडीनंतर भाजपाने सक्रिय होत बऱ्याच हालचाली केल्या. त्याचे फलित म्हणून उपसरपंच डॉ. विनायक डोहे आणि माजी सरपंच निर्मलाताई मरस्कोले यांनी भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. यापूर्वीच शेतकरी संघटनेचे प्रमुख कारकर्ते सुदामजी लांडे यांनी भाजपा प्रवेश करून मोठ्या बदलाचा श्रीगणेशा केला होता.

भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख देवराव दादा भोंगळे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, कोरपना तालुका अध्यक्ष संजयभाऊ मुसळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावाच्या विकासाला गती देण्यासाठी हा भव्य भाजपा प्रवेश असल्याचे मनोगत डॉ. विनायक डोहे यांनी यावेळी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये